शिवरायांच्या पुतळ्याची चोरी संतापजनक घटना, लोकभावनेचा प्रश्न; रोहित पवार यांची राज्य सरकारला विनंती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी झाली आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती केली आहे. पाहा...
मुंबई : अमेरिकेतील सॅन होजे शहरातील उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी झाली आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती केली. “सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे. याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी, ही विनंती”, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
Published on: Feb 08, 2023 02:54 PM