पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; रोहित पवार म्हणाले, त्यांच्या अनुभवाचा आदर पण…

| Updated on: Feb 14, 2023 | 8:10 AM

पहाटेचा शपथविधी, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट अन् राष्ट्रवादीची भूमिका; कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहा...

अहमदनगर : tv9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या या विधानांवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीससाहेब मोठे नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा मी आदर करतो. पण पहाटेच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे अजितदादा आणि पवारसाहेबच सांगू शकतील”, असं रोहित पवार म्हणालेत. फडणवीस म्हणाले होते की, काहीही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार नाही. त्याचं काय झालं?, असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.

Published on: Feb 14, 2023 08:02 AM
सहानभूतीसाठीच देवेंद्र फडणवीस यांचा खटाटोप, रोहित पवार यांचा थेट आरोप काय ?
जिवलग मित्रानेच मुख्यमंत्री शिंदे यांची काढली लायकी, म्हणाले हिंमत असेल तर…