काँग्रेसकडून रोहित टिळक यांना उमेदवारीचा प्रस्ताव होता पण…; रोहित पवार यांचं कसबा पोटनिवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Feb 06, 2023 | 12:42 PM

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. तसंच रोहित टिळक यांच्याबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. पाहा...

सोलापूर : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. दोन्ही मतदारसंघात जनतेची भाजपवर नाराजी आहे. भाजपचे कसब्यातील समीकरण फसलेलं आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. पिंपरी चिंचवड मध्ये उमेदवाराला नाही मात्र भाजप आहे म्हणून फटका बसेल. दोन्ही मतदारसंघात परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळेल, असं रोहित पवार म्हणालेत. रोहित टिळकांना काँग्रेसकडून उमेदवारीचा प्रस्ताव केलेला होता मात्र त्यांनी तो नाकारल्याची माहिती आहे. भाजपने कसब्यातले जे समीकरण केलं आहे. रासनेंना उमेदवारी दिली आहे. ते यशस्वी ठरलं तर या पुढच्या काळामध्ये तेच समीकरण या पुढच्या काळात राबवलं जाईल. मात्र भाजपने तसं समीकरण राबवलं तर कसब्यातले मतदार भाजपसोबत राहणार नाहीत, असंही रोहित म्हणालेत.

आमच्या ‘कोट’चा विचार त्यांनी करू नये, देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांना सल्ला
पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? काय म्हणाले विजय वडेट्टीवार