“कोणी कितीही इंधनाचा वापर करा, पवारांमध्ये आग लागणार नाही”, सामनाच्या अग्रलेखावरून रोहित पवारांची टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखात त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थिती केले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
अहमदनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखात त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थिती केले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. “सामना अग्रलेखात सर्वच सत्याला धरून असतात असं नाही. बाहेर बसून कोणी असं दुसऱ्या पक्षाबद्दल संदेश देण्यापेक्षा सामान्य लोकांच्या अडचणी देखील सामनाने दिल्या पाहिजे.कोणी कितीही गॅसचा, रॉकेलचा, पेट्रोलचा कुठल्याही इंधनाचा वापर केला तरी पवारांमध्ये कधीच आग लागू शकत नाही.ज्यांनी प्रयत्न केला त्यांना कळून चुकलं आहे, त्यामुळे उगाच वेळ वाया घालू नये”, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
Published on: Jun 13, 2023 01:26 PM