रोहित पवार यांचा त्रागा, ‘मी फालतू राजकारणात आलो’, ‘पैशाची मस्ती आणि सत्तेचा घमंड आलाय…’

| Updated on: Sep 02, 2023 | 11:11 PM

जालना येथे झालेल्या घटनेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार प्रचंडे संतापले आहेत. पक्ष फोडणे, आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणे असे त्यांचे उद्योग सुरु आहेत. राज्य सरकारला सत्तेचा घमंड आला आहे. या सरकारला धडा शिकवायला हवा असे रोहित पवार म्हणाले.

मुक्ताईनगर : 2 सप्टेंबर 2023 | राज्यसरकार एसीमध्ये बसून फक्त घोषणा करतं. आता जे राजकारण चालू आहे ते फालतू राजकारण चालू आहे. जसा काळ बदलतो तशा नवीन गोष्टी येतात. आताचे सरकार पूर्वीच्या सरकार सारखे नव्हतं. विरोधकांना संपवण्याचा काम सरकार करत आह्रे. मी फालतू राजकारणात आलो, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी त्रागा व्यक्त केला. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवण्याचे काम भाजपाने केलं. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांनी पक्ष वाढवण्याचे काम केलं. पण आता काय परिस्थिती आहे. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. पण, वेगवेगळे पक्षात आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाने पक्ष फोडलं. जालना मराठा समाजावर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला. मुला बाळांना बेदम मारहाण केली. ते पाहता या सरकारला घमंड आला आहे. सरकारला धडा दाखवण्याची वेळ आली आहे. एका व्यक्तीने सांगितलं होतं की मी परत परत येणार. ही पैशांची मस्ती आहे. अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसें यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.

Published on: Sep 02, 2023 11:11 PM
‘महाराष्ट्र पेटवून शेकवायला निघाले…’, शरद पवार यांच्यावर कुणी केला हा हल्लाबोल
Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल ED च्या अटकेत, ‘या’ तारखेपर्यंत ईडी कोठडी