“माझं वय नाही, मग मला का टार्गेट करता?”, रोहित पवार यांचा छगन भुजबळ यांना खोचक सवाल
"मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल," असा इशाराच यावेळी छगन भुजबळांनी रोहित पवारांना दिला. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: “मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल,” असा इशाराच यावेळी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी रोहित पवारांना दिला. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” छगन भुजबळ नेतेपदावर होते तेव्हा माझा जन्म झाला नाही, त्यात माझी काय चूक, तुम्ही माझ्य मतदारसंघात या माझ्या पराभवासाठी प्रयन्त करा…”रोहित पवार नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 10, 2023 02:56 PM