महाराष्टातले भाजप नेते कमी पडले? फडणवीस यांना का लागली मोठ्या नेत्यांची गरज? रोहित पवार म्हणतात…

| Updated on: Aug 02, 2023 | 9:26 AM

भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही असं विधान केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर : भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही असं विधान केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असं काही नेत्यांनी सांगितलं.कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात नक्कीच चालणार नाही, मात्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपचे मोठे नेते येऊन प्रचार करतील असं सांगितलं.2024 च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र पॅटर्न बघायला मिळेल आणि तो कर्नाटकपेक्षाही ताकदवान असेल, याचा अंदाज फडणवीस यांना आला आहे, म्हणून एवढ्या लवकर भाजपची ही बैठक झाली. जेव्हा महाराष्ट्रातले नेते कमी पडतात, तेव्हाच बाहेरच्या नेत्यांची गरज लागते, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

Published on: May 19, 2023 04:05 PM
तुळजाभवनी मंदिर प्रकरणानंतर आता ‘या’ मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी, काय लावले बॅनर्स
‘महाविकास आघाडी टिकणार नाही, केवळ धडपड सुरुये’; ‘या’ नेत्यानं केला दावा