“वयापेक्षा भूमिकेचं बोलणं जास्त महत्वाचं”, रोहित पवार यांचा अजित पवार गटावर पलटवार
अजित पवार गटात गेलेल्या आमदारांपैकी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. भुजबळ यांनी तर रोहित पवारांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळेस मी मुंबईचा महापौर होतो, अशी टीका केली होती. यावर रोहित पवार यांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बहुतांशी आमदार अजित पवार गटात गेले आहेत. अजित पवार गटात गेलेल्या आमदारांपैकी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. भुजबळ यांनी तर रोहित पवारांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळेस मी मुंबईचा महापौर होतो, असे म्हणत जास्त बोलला तर तुमच्या मतदारसंघत येऊन जाहीर सभा घेईल असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “वयाच्या बाबतीत सगळेच बोलतात. माझं वय कमी आहे आणि शरद पवार यांचं वय जास्त आहे. पण शरद पवार यांच्या भूमिकेवरून बोलता त्यांचं वय जास्त आहे. आणि आमच्यासारखी युवा पिढी जेव्हा बोलते तेव्हा बोलतात तुझं वय कमी आहे. माझं एकचं म्हणणं आहे. वयापेक्षा भूमिकेचं बोलणं आणि विचारांचं बोलणं जास्त म्हत्वाचं आहे.”
Published on: Jul 12, 2023 10:46 AM