“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कोणी लागू नये”, रोहित पवार यांचा इशारा; “राम शिंदे यांनी…”
चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून राजकारण करू नये असा सल्ला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला होता.
अहमदनगर : चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून राजकारण करू नये असा सल्ला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला होता. यावरून रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लगावला आहे. राजकारणाच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा पवारांना जास्त माहिती आहे. पवार कधीच राजकारण सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीमध्ये करत नाही. ज्या ठिकाणी राजकारण करायला पाहिजे, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कोणी लागू नये. त्यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही आणि आम्हाला समाजकारण शिवाय काही कळत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
Published on: May 31, 2023 01:15 PM