Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या समर्थकांचा असा हा स्टंट..! व्हिडीओ व्हायरल..!

| Updated on: Aug 13, 2022 | 7:51 PM

विशेषत: शिंदे गटातील मंत्री हे मतदार संघात परतल्यानंतर त्यांचे अशाप्रकारे स्वागत केले जात आहे. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जळगावात दाखल झाले, त्यांच्या स्वागतासाठी भव्य कार रॅली काढण्यात आली, या रॅलीत समर्थकांनी जीव धोक्यात घालून धिंगाणा घातला. समर्थक भरधाव कारच्या टपावर चढून नाचत होते, यावेळी त्यांना जीवाची ही पर्वा केली नाही.

जळगाव : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्री हे आपआपल्या मतदार संघात परतत आहेत. मात्र, अशा लोकप्रतिनिधींचे स्वागत दणक्यात केले जात आहे. खातेवाटप लांबणीवर पडल्याने सर्व मंत्र्यांनी मतदार संघ जवळ केला आहे. त्यानुसार मंत्री गुलाबराव पाटील हे देखील जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मतदार संघात पाटील येणार म्हणल्यावर त्यांचे स्वागतही तसेच दणक्यात करण्यात आले. तर याच दरम्यान तरुणांचा उत्साह असा काय दिसून आला की अनेकांनी तर जीव धोक्यात घालून वाहन भरधावात असताना त्यावर चढून डान्स केला आहे. विशेषत: शिंदे गटातील मंत्री हे मतदार संघात परतल्यानंतर त्यांचे अशाप्रकारे स्वागत केले जात आहे. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जळगावात दाखल झाले, त्यांच्या स्वागतासाठी भव्य कार रॅली काढण्यात आली, या रॅलीत समर्थकांनी जीव धोक्यात घालून धिंगाणा घातला. समर्थक भरधाव कारच्या टपावर चढून नाचत होते, यावेळी त्यांना जीवाची ही पर्वा केली नाही.

Bhavna Gawli : खासदार भावना गवळी वर्षभरानंतर मतदारसंघात सक्रिय, नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार
Abdul Sattar : मंत्रिपद मिळाले आता खात्याबाबत आशादायी नाही, जनतेची कामे हाच ध्यास