Mallikarjun Kharge on Raut | सत्ताधाराऱ्यांना विरोधक मुक्त संसद हवी, मल्लिकार्जून खरगे यांची टीका
Mallikarjun Kharge on Raut | विरोधकांना संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याची टीका खरगे यांनी केली आहे.
Mallikarjun Kharge on Raut | सत्ताधारी भाजपला विरोधक मुक्त संसद हवी आहे, त्यासाठीच देशात सर्वदूर त्यांचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केली आहे. ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay Raut) यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपनं (BJP) किती ही दबावतंत्राचा वापर केला तरी विरोधक ही झुकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आमचा सत्ताधाऱ्यांशी झगडा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सातत्याने दबाव तंत्राचा वापर करत आहेत. पण विरोधक त्यांना जुमणार नाहीत. ते या अन्यायाविरोधात लढा देतील अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जून खरगे यांनी दिली. दरम्यान संजय राऊत यांच्या अटकेनंतर विरोधकांना चिरडून टाकण्यासाठी सरकार सूडबुद्धीचा वापर करत असल्याच्या प्रतिक्रिया विरोधी गोटातून येत आहेत. तर भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाशी पक्षाचा काहीऐक संबंध नसून ईडी कायदेशीपणे त्यांचे काम करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.