Rupali Chakankar | ‘थोबाड रंगवण्याची भाषा महाराष्ट्रात कुणी करु नये’ : रुपाली चाकणकर
अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडून थोबाड रंगवण्याची भाषा केल्यानंतर, अशी भाषा महाराष्ट्रात कोणी करू नये असा इशारा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. इतकेच काय तर तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखिल महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. यादरम्यान अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात ट्वीटर वार पहायला मिळाला. तर यावरूनच चित्रा वाघ यांनी उर्फीला थोबाड रंगवण्याची भाषा वापरली आहे. त्यावरून आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वाघ यांनी खडेबोल सुनावले आहेत. तसेच महाराष्ट्रात अजून कायदा-सुव्यवस्था जीवंत असल्याचेही म्हटलं आहे.
सार्वजनिक ठिकाणी महिलांनी कसे कपडे घालावेत यावरून सुरू झालेला चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. चित्रा वाघ यांनी जिथे सापडेत तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिला. यावर महाराष्ट्रात अजून कायदा-सुव्यवस्था जीवंत आहे. महाराष्ट्रात कोणी थोबाड रंगवण्याची भाषा करू नये असे रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.
तर अशा गोष्टींसाठी पोलीस प्रशासन आहे तुम्हाला असं काही जाणवत असेल तर तुम्ही रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात करू शकता असाही सल्ला चाकणकरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.