Video : महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी गणेश नाईकांना तात्काळ अटक करणार- रुपाली चाकणकर

| Updated on: Apr 17, 2022 | 5:08 PM

भाजपा नेते (BJP Leader) आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गणेश नाईक यांनी झालेल्या अपत्याचा स्वीकार केला नाही. यासंबंधी पीडितेने तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या या तक्रारीनुसार आता […]

भाजपा नेते (BJP Leader) आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गणेश नाईक यांनी झालेल्या अपत्याचा स्वीकार केला नाही. यासंबंधी पीडितेने तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या या तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाहीदेखील लवकरच केली जाईल, असेही चाकणकर म्हणाल्या.

VIDEO : Hanuman Chalisa म्हणत Amol Mitkari यांचे Raj Thackeray यांना प्रतिउत्तर
Video : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल