रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अहवालावर महिला आयोग आसमाधानी
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अहवालावर महिला आयोग आसमाधानी आहे. आज पत्रक काढून महिला आयोग भूमिका मांडणार. पाहा व्हीडीओ...
मुंबई : रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ला आणि मारहाण प्रकरणी आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. या प्रकरणाची आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. पोलीस आयुक्त ठाणे यांना या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व्यक्तिशः आयोग कार्यालयात उपस्थित राहून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतीत अहवाल सादर करण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आव्हाड हे आयोग कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. आज संध्यकाळी महिला आयोग आपली भूमिका मांडणार आहे. पत्रक काढून महिला आयोग भूमिका मांडणार आहे. काल आयोगाने ठाणे पोलिसाना आदेश दिल्यानंतर कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आज अहवाल सादर केला. पण अहवालात सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत, असं महिला आयोगाने म्हटलं आहे.
Published on: Apr 06, 2023 03:01 PM