चित्रा वाघ यांनी खोटी माहिती प्रसारित केली; काय म्हणाल्या रूपाली चाकणकर
राज्य महिला आयोगाच्या संदर्भात चुकिची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासह आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी आयोगाने वाघ यांना नोटीस पाठवली आहे. तसेच दोन दिवसांत खुलासा करण्याच्या सुचना ही दिल्या आहेत.
पुणे : अभिनेत्री उर्फी जावेद सध्या भलतीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिच्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असून राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद होताना दिसत आहे. यादरम्यान चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोग हा वेब सिरिजवरून तेजस्विनी पंडीत यांना नोटीस पाठवतं पण उर्फी जावेदला कसलीच समज दिली जात नाही. तिला नोटीस पाठवली जात नाही, असा आरोप वाघ यांनी पत्रकार परिषद घेत काल केला होता. त्यावरून आता चित्रा वाघ या महिला आयोगाच्या रडारवर आल्या आहेत.
राज्य महिला आयोगाच्या संदर्भात चुकिची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासह आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी आयोगाने वाघ यांना नोटीस पाठवली आहे. तसेच दोन दिवसांत खुलासा करण्याच्या सुचना ही दिल्या आहेत.
वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे, महिला आयोगाची गरिमा राखली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. महिला आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. तक्रार आल्यानंतर विधी विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. काल पत्रकार परिषदेत खोटी माहिती ही पत्रकारांना दिली असे चाकणकर म्हणाल्या.