Special Report | रुपाली चाकणकर यांना आमदार व्हावसं वाटतंय, पण तिकीट कोण देणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आमदार व्हावसं वाटतंय. "2024 मध्ये मी खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मागणार असल्याच", त्यांनी सांगितलं. "2019 मध्येच मी उमेदवारी मागितली होती, मात्र त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले होते, आता मी उमेदवारी मागणार आहे", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आमदार व्हावसं वाटतंय. “2024 मध्ये मी खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मागणार असल्याच”, त्यांनी सांगितलं आहे. “2019 मध्येच मी उमेदवारी मागितली होती, मात्र त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं, आता मी उमेदवारी मागणार आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. खरं तर रुपाली चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला फलक लागले होते. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आमदारकीची इच्छा व्यक्त केली आहे. चाकणकर यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, पण आता त्या कोणत्या पक्षातून उमेदवारी लढवणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर पडदा टाकत मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणार असल्याचंही त्या म्हणाल्या. मात्र 2024 मध्ये आता रुपाली चाकणकर यांना उमेदवारी मिळते का? आणि त्या कोणत्या पक्षाकडून लढणार, यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…