VIDEO | गौतमी पाटील हिचं नाव घेणे भाजप नेत्याच्या अंगलट’; राष्ट्रवादीच्या नेत्या भडकल्या, म्हणाल्या, ”नाच्या”
यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख महाविकास आघाडीची गौतमी पाटील असा केला. तसेच तिला बघायला जस लोकांना आवडतं, तसं यालाही वाटतं… हा गैरसमज दूर करायला हवा. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपचं सामान याला पाठवून दे असे म्हटल होतं.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टिका केली. या टिकेला उत्तर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत दिल. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख महाविकास आघाडीची गौतमी पाटील असा केला. तसेच तिला बघायला जस लोकांना आवडतं, तसं यालाही वाटतं… हा गैरसमज दूर करायला हवा. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपचं सामान याला पाठवून दे असे म्हटल होतं. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी जशाच तसं उत्तर दिलं आहे. तसेच नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. भाजपने राजकारणाचा स्तर खाली आणला आहे. राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर करायला किंवा मनोरंजन करायला नितेश राणे येतात. मात्र यावेळी त्यांनी गौतमी पाटील हिचं नाव घेतली. ती तिच्या पोटासाठी काम करते. गौतमी पाटीलसोबत संजय राऊत यांची तुलना का करायची? महिलांना हिणवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असे बोल सुनावले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी सभ्यता राहिली असेल तर त्यांनी नितेश राणे यांना समज द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नितेश राणे म्हणजे भाजपचे नाच्या! टिल्लू भाऊ बहुतेक नाच्या आहेत, अशा शब्दात पाटील यांनी नितेश राणे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.