“तानाजी सावंत यांनी मेंदूचा इलाज करून घ्यावा”, राष्ट्रवादीची ‘ही’ महिला नेता संतापली
सुषमा अंधारे यांच्याविरोधात शिंदे गटातील नेत्यांची वादग्रस्त विधान सुरूच आहेत. राष्ट्रवादीने एक महिलेला ठाकरे गटाला भाडे तत्वावर दिलं आहे, असं विधान करून मंत्री तानाजी सावंत नव्या वादात सापडले आहेत. "राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तानाजी पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
पुणे : सुषमा अंधारे यांच्याविरोधात शिंदे गटातील नेत्यांची वादग्रस्त विधान सुरूच आहेत. राष्ट्रवादीने एक महिलेला ठाकरे गटाला भाडे तत्वावर दिलं आहे, असं विधान करून मंत्री तानाजी सावंत नव्या वादात सापडले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तानाजी पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. सत्तेमधील भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी भान ठेवून बोलावं. सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारमधल्या नेत्यांची महिला नेत्यांवर अश्लील शब्दात बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे. तानाजी सावंत कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाचं भान ठेवावं. एकदा त्यांनी आपल्या मेंदूवर इलाज करून घ्यावा,तसेच तुमच्या रणरागिनींना महाविकास आघाडीच्या नवदुर्गा जशास तसं उत्तर द्यायला तयार आहेत”, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.