‘राऊत यांच्या यांच्या जिभेला हाड नाही’; निधी वाटपाच्या आरोपावरून भाजप नेत्यानं खडसावलं
शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना लागणार विकास निधी दिला नाही. यावरून आथा महाविकास आघाडी सरकार असतानाचा जशी निधीवरून ओरड व्हायची तशीच सुरू झाली आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | अजित पवार यांनी अर्थमंत्रालय आपल्याकडे घेताच आपला गट, शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांवर निधी वाटपाचा पाऊस केला आहे. मात्र त्यांनी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना लागणार विकास निधी दिला नाही. यावरून आथा महाविकास आघाडी सरकार असतानाचा जशी निधीवरून ओरड व्हायची तशीच सुरू झाली आहे. तर शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी निधी वाटपावरून अजित पवार भेदभाव करत असल्याचा आरोप करताना टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. तर माझ्या हातात तुजोरी आहे म्हणून लुटमार करायची, याला लूटमार म्हणतात असा घणाघात केला होता. आता त्यांच्या टीकेची पावसाळी अधिवेशनात देखीस चर्चा होताना दिसत आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी, राऊत यांच्या जीभेला हाड नसून ते वाटेल ते बोलतात. त्यामुळे आता त्यांच्या बोलण्याला आम्ही गांभीर्याने बघत नाही असं म्हटलं आहे. तर आपण त्यांचा आरोप पुराव्यानिशी खोडून काढू असेही महाजन यांनी म्हटलं आहे.