‘त्यांनी आमच्याशी घातपात केला, ते आता बाजूला झाले’; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Jul 23, 2023 | 7:28 AM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि नेत्यांकडून भाजपवर टीकास्त्र सोडलं जात. यावरून भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जळगाव | 23 जुलै 2023 : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत चांगलेच वाद होताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि नेत्यांकडून भाजपवर टीकास्त्र सोडलं जात. यावरून भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, आमची दोस्ती कधीच तुटणार नाही, आमची दोस्ती एकदा झाली की ती एकदम पक्की होते. शिवसेनेची आणि आमची दोस्ती 25 वर्षांपासून होती आणि आताही आहे. ज्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, खरं म्हणजे त्यांनी आमच्याशी घातपात केला, ते आता बाजूला झाले आहेत, अशा शब्दात महाजन यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत. आता राष्ट्रवादी सोबत म्हणजेच अजित पवारांसोबत आमची मैत्री झाली आहे, ती कायमस्वरुपी राहील. अजित पवार हे अतिशय अनुभवी नेते आहेत, प्रशासनावर त्यांची पकड आहे. महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्त्वात पुढे जाईल. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एक पुढचं पाऊल पडलं आहे, असंही महाजन म्हणालेत.

Published on: Jul 23, 2023 07:24 AM
अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं लग्न कसं ठरलं? ऐका त्यांच्याकडून…