जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हल्ल्यात जळून खाक

| Updated on: Feb 28, 2022 | 11:13 AM

रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान एएन२२५ (AN225) जळून खाक झाले आहे. रशियाच्या  हल्ल्यात नष्ट झालेले विमान हे कार्गो विमान होतं.

रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान एएन२२५ (AN225) जळून खाक झाले आहे. रशियाच्या  हल्ल्यात नष्ट झालेले विमान हे कार्गो विमान होतं. हे सहा इंजिने असलेले विमान असून ते नष्ट झाल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. युक्रेनमधील अँटोनोव्ह विमान कंपनीने या मॉडेलच्या केवळ एकमेव विमानाची निर्मिती केली होती. एका छायाचित्राच्या आधारे, AN-225 नष्ट झाल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. ज्यामध्ये विमान बॉम्बस्फोटाने नष्ट होत असल्याचे दिसून आले होते.

Published on: Feb 28, 2022 11:13 AM
पिंपळगावमध्ये बंदीनंतर पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन
China कडून 22 उपग्रहांचे एकाच वेळी यशस्वी प्रक्षेपण