पहिल्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली; ठाकरे गटाच्या आमदाराचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप

| Updated on: Jun 26, 2023 | 10:45 AM

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबई झोडपलं. पहिल्याच पावसामुळे अंधेरीतील सबवे पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतुकीलाही मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर आमदार ऋतुजा लटके यांनी या सबवेला भेट दिली आणि नालेसफाईची पाहणी केली.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबई झोडपलं. पहिल्याच पावसामुळे अंधेरीतील सबवे पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतुकीलाही मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर आमदार ऋतुजा लटके यांनी या सबवेला भेट दिली आणि नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांनी पालिका आयुक्तावर गंभीर आरोप केल आहेत. त्या म्हणाल्या की, “मुंबईत पहिल्यांदाच पाऊस पडला. केवळ 1 ते 2 तास पाऊस पडला, त्यानंतर अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरलं. मोठी वाहने अडकली होती, लोकांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले जात होते. यासाठी एसडब्ल्यूडी पूर्णपणे जबाबदार आहे. यात कोणतेही राजकारण न करता अधिकाऱ्यांनी मनापासून काम करावे, असे मला वाटते. अंधेरीची सर्वात मोठी समस्या म्हणजे गोखले ब्रिज बंद आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी अंधेरी सबवे हा दुसरा मार्ग आहे, हाही पावसात बंद झाला तर लोक कुठे जातील, या सर्वांसाठी महापालिका आयुक्त जबाबदार आहेत.”

Published on: Jun 26, 2023 10:45 AM
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, आदित्य ठाकरे ‘शेंबडं पोरगं’; भाजप नेत्याची सडकून टीका
खासदार नवनीत राणांची डोकेदुखी वाढणार आता ‘या’ खासदारानं उभं केलं आव्हान