“मुख्यमंत्री शिंदेंचा पचका, अजितदादांचं दादापण संपलं;” सामनातून जहरी टीका
गेल्यावर्षी मविआचे नेते असेलेले एकनाथ शिंदे यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. याला एक वर्ष होताच अजित पवार यांनी बंड केला आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आजच्या 'सामना'तील 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. गेल्यावर्षी मविआचे नेते असेलेले एकनाथ शिंदे यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. याला एक वर्ष होताच अजित पवार यांनी बंड केला आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आजच्या ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांची खिल्ली उडवली आहे.”राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार त्यांच्या या कृतीमुळे ‘दादा’ राहिले नाहीत. त्यांचे दादापण संपले आहे. ‘देशबुडव्यांच्या हाती महाराष्ट्र’ गेला आहे. ‘महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाचे मिळून 165 आमदारांचे बहुमत असतानाही भाजपने (BJP) अजित पवारांना फोडले आणि बहुमत जोडले यामुळे सगळ्यात मोठा पचका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झाला.”