गृहमंत्र्यांचे इशारे-नगारे, दंगली हाच यांचा आधार; सामनातून भाजपवर निशाणा

| Updated on: Apr 27, 2023 | 8:05 AM

Saamana Editorial On Amit Shah : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजप आणि विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. “प्रत्येक मुद्दयावरून धार्मिक उन्माद वाढविण्याचा, दंगली भडकविण्याचाच प्रयत्न भाजप का करीत आहे? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना फक्त दंगलीच का दिसत आहेत? प्रश्न अनेक असले तरी त्यांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे दंगली हाच भाजपच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा आधार बनल्या आहेत. कर्नाटकातही बोम्मई सरकारचे जाजम तेथील जनता खेचून घेणार याची जाणीव भाजपला झाल्यानेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा दंगलींचे इशारे नगारे वाजविले आहेत. अर्थात, प्रश्न त्यांच्या नगाऱ्यांचा नसून देशातील जातीय, धार्मिक शांतता आणि सलोख्याचा आहे. कर्नाटकातील जनता हा ‘नगारा’ फोडेल आणि भाजपच्या विद्वेषी राजकारणाचा भंडाफोड करेल, हे नक्की!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Published on: Apr 27, 2023 08:05 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच काउंटडाऊन सुरू झालायं; राष्ट्रवादी नेत्याने काय दिले संकेत?
शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल