“महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हे याद राखा”, सामनातून भाजपला इशारा
तुम्ही सातत्याने भाजपला कमळाबाई म्हणत हिणवता, आम्हीही तुम्हाला ‘पेंग्विन’सेना म्हणू असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ असा उल्लेख करण्यात आला आहे. “शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट […]
तुम्ही सातत्याने भाजपला कमळाबाई म्हणत हिणवता, आम्हीही तुम्हाला ‘पेंग्विन’सेना म्हणू असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ असा उल्लेख करण्यात आला आहे. “शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.