सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा, तर डोनाल्ड ट्रम्प यांचाही दाखला; पाहा…

| Updated on: Apr 05, 2023 | 9:26 AM

Saamana Editorial on BJP PM Nremdra Modi : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. “पंतप्रधान श्री. मोदी यांचे सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने केलेले भाषण भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे, आमच्या विरोधकांना सोडू नका, असा संदेश देणारे आहे. कारवाया व अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Published on: Apr 05, 2023 08:31 AM
4 Minutes 24 Headlines | फडणवीस यांच्यावर परत बोलाल तर फिरू देणार नाही : बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा
रोशनी शिंदेंना माहराणीच्या आधी नेमक काय झालं?; नवी अपडेट