आजचा अर्थसंकल्प म्हणजे बुडीत कर्जाचा ढेकर; सामनातून टीकेचे बाण
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. पाहा...
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. “देशातील सात लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे खटले ‘सरफेसी’ कायद्यांतर्गत सुरू असले तरी त्या कर्जाची वसुली अशक्य असल्याचे समोर आले आहे . म्हणजे कर्जबुडव्या कंपन्यांपासून बुडीत कर्जापर्यंत सगळे काही लाखांत आणि कोटय़वधींमध्येच आहे . देशातील सामान्य माणूस कर्जाचा हप्ता कसा भरायचा , या विवंचनेत आहे आणि काही लाख कोटी रुपये बुडविणाऱ्या कंपन्यांचे मालक बुडीत कर्जाचा ‘ ढेकर ‘ देत निर्धास्त आणि बिनधास्त आहेत . सरकार कागदी घोडे नाचविण्यात , तर कंपनी व्यवहार मंत्रालय कर्जवसुली खटल्यांच्या ‘ फार्स ‘ मध्ये मग्न आहे . हे असेच सुरू राहिले तर हा फार्स उद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘ फास ‘ ठरू शकतो , पण त्याचा विचार करायला सरकारला वेळ कुठे आहे ?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.