“सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की! या दोन नेत्यांचं नाव चर्चेत”

| Updated on: Apr 25, 2023 | 8:05 AM

Saamana Editorial on CM Eknath Shinde : सध्याचे मुख्यमंत्री जाणार हे नक्की! पाटावर कोण बसणार?; सामना अग्रलेखातून सरकारमधील कथित बदलांवर भाष्य.

मु्ंबई : सरकारमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहेत. खासदार संजय राऊत वारंवार यावर बोलताना दिसत आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. “भर मंडपात ‘वरमाला’, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले. त्या धक्क्यातून ते अद्यापि सावरलेले दिसत नाहीत. त्यात आता मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे- पाटलांचे नाव तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे. मिंधे गट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात दंग आहे, तर फडणवीस गटवरून गोडबोलेपणाचा आव आणत पाठीमागून वेगळाच ताव मारीत आहे. ते काही असो. सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पाहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ व अराजक कधीच माजले नव्हते!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Published on: Apr 25, 2023 07:53 AM
शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय? 2024 ला मविआ वेगळं लढणार? पाहा संजय आवटे यांचं विश्लेषण
अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालं, हळद पिकाला बुरशी; शेतकरी पुन्हा हवालदिल