“…म्हणूनच तुम्ही कलंकित आहात!”, सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे.या सगळ्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये जाहीर सभा घेतली. सभेदरम्यानं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार कलंक असा केला. ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. या सगळ्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.‘कलंक’ मतीचा झडो!, या शीर्षकाखाली हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. नेमकं या अग्रलेखात काय लिहलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 12, 2023 01:04 PM