Video : मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर सामनातून टीकास्त्र
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) जात सरकार स्थापन केलं किंबहुना त्यांच्या बंडापासूनच शिंदेगटाच्या एक ना एक हालचालीवर शिवसेनेतून प्रखर शब्दात टीका केली जात आहे. अश्यात नुकतंच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पण खातेवाटप अद्याप झालेलं नाही. त्यावर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. “बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!” […]
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) जात सरकार स्थापन केलं किंबहुना त्यांच्या बंडापासूनच शिंदेगटाच्या एक ना एक हालचालीवर शिवसेनेतून प्रखर शब्दात टीका केली जात आहे. अश्यात नुकतंच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पण खातेवाटप अद्याप झालेलं नाही. त्यावर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. “बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार!” या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आलाय. “3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे”, असं सामनात म्हण्यात आलं आहे.