आदित्य ठाकरे पुन्हा टार्गेटवर? वरळीतील बेस्ट थांबे हटविले? सचिन अहिर यांच्याकडून सरकारवर हल्लाबोल
सिमेन्स कंपनीच्या कार्यालयाजवळील कॉ. पी. के. कुरणे चौकाजवळ बेस्ट उपक्रमाचे दोन थांबे होते. हे थांबे हलवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
मुंबई, 23 जुलै 2023 | गेली अनेक वर्षे वरळी परिसरातीस सिमेन्स कंपनीच्या कार्यालयाजवळील कॉ. पी. के. कुरणे चौकाजवळ बेस्ट उपक्रमाचे दोन थांबे होते. हे थांबे हलवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र लिहुन बस थांबे लवकर पूर्वरत करावेत अशी मागणी केली आहे. बंद केलेल्या बस स्टॉपजवळच बेस्टचे बस आगार आहे. या आगारातून ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर दादर, भोईवाडा, परळ आदी भागात बस जातात. यापैकी परळ, हिंदमाता दादर, प्रभादेवी, वांद्रे परिसरात जाणाऱ्या बस कॉ. पी. के. कुरणे चौकातील थांब्यावर उभ्या राहात होत्या. या बसथांब्यावर थांबणाऱ्या बसमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने येत होते पण आता प्रवाशांना समस्या होणार आहेत. लवकरात लवकर हे बस स्टॉप पूर्वरत करण्यात यावे अन्यथा आम्ही विधानपरिषदेत प्रश्न मांडू, तसेच बिल्डरच्या फायद्यासाठी हे केलं जातंय का असा सवाल सचिन अहिर यांच्याकडून उपस्थित केला आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदार संघ पुन्हा टार्गेटवर आला आहे का असा सवाल देखील आता अनेकांच्या मनात येत आहे.