Sachin Kharat : राज्यात तुम्ही धर्मवादी आणि जातीयवादी राजकारण करताना दिसत आहात, सचिन खरातांचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Sep 03, 2022 | 5:13 PM

ज्यावेळेस राज्यात भाजपा सरकार होते, त्यावेळी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाली. त्यावेळी तुम्ही म्हणालात, की एकही वीट रचू दिली जाणार नाही. परंतु आता राज्यात तुम्ही धर्मवादी आणि जातीयवादी राजकारण करताना दिसत आहात, असा घणाघात खरात यांनी राज ठाकरेंवर केला.

मुंबई : सत्ता प्राप्त करण्यासाठी गुजरातमधील नेत्यांचे मंडलिक बनू नका, अशी जळजळीत टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. राज ठाकरेजी तुम्ही पक्ष काढून 17 वर्ष झाली. मात्र असे असूनसुद्धा तुम्हाला राज्यातील जनतेने सत्ता दिली नाही. आता ऐनकेन प्रकारे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, हे राज्याला दिसत आहे. तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवला. ज्यावेळेस राज्यात भाजपा (BJP) सरकार होते, त्यावेळी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाली. त्यावेळी तुम्ही म्हणालात, की एकही वीट रचू दिली जाणार नाही. परंतु आता राज्यात तुम्ही धर्मवादी आणि जातीयवादी राजकारण करताना दिसत आहात, असा घणाघात खरात यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray)  केला.

Published on: Sep 03, 2022 04:52 PM
Cocaine Seized : मुंबई विमानतळावरून जप्त केलं 13 कोटींचं 1300 ग्राम कोकेन, एकाला अटक
Atul Save : ऊस गळीत हंगाम यंदा लवकर सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे विनंती, अतुल सावे यांची माहिती