‘… तर संजय शिरसाट यांचं डिपॉझिट करू’, ‘या’ बड्या नेत्याने दिला इशारा

| Updated on: Aug 01, 2023 | 1:03 PM

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या विषयी बोलताना म्हणाले, अजितदादा म्हणायचे, काका मला वाचवा. परंतु संजय शिरसाठ तुमच्यासारख्या कमी उंचीच्या आणि कमी विचाराच्या लोकांविषयी अजितदादा बोलत नसतात.

मुंबई : “शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या विषयी बोलताना म्हणाले, अजितदादा म्हणायचे, काका मला वाचवा. परंतु संजय शिरसाठ तुमच्यासारख्या कमी उंचीच्या आणि कमी विचाराच्या लोकांविषयी अजितदादा बोलत नसतात. परंतु तुम्हाला अजितदादा यांचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून सतत तुम्ही अजितदादा यांच्या नावाचा जप करत असता. अजितदादा यांचे काका आदरणीय शरद पवार आहेत, याचा अजितदादा यांना अभिमान आहे. परंतु संजय शिरसाठ मला जर राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष म्हणून तुमच्या विरोधात उमेदवारी दिली तर नक्कीच तुमचं डिपॉजिट जप्त करू आणि आता फडणवीस साहेब मला वाचवा असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर वेळ आणू”, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली आहे.

Published on: May 21, 2023 09:04 AM
कर्नाटक निवडणूक अन् विजयाचे पाच मंत्र; काँग्रेसची 5 वचने कोणती? आश्वासन काँग्रेस पाळणार?
पावसाळ्यात मेळघाटात काय होते अवस्था? अमरावतीत किती गावांना पुराचा धोका?