मोठी बातमी! 500 कोटींच्या घोटाळा आयआरएस अधिकाऱ्याला भोवला; ईडीकडून सचिन सावंत यांना अटक
सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले अधिकारी सावंत यांच्या घरावर मंगळवारी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तर त्याच्यावर भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे.
मुंबई : 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले अधिकारी सावंत यांच्या घरावर मंगळवारी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तर त्याच्यावर भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. तर त्यांच्यावर हिरे कंपन्यांद्वारे 500 कोटींहून अधिक रक्कमेचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर याप्रकरणी एका अरोपीला याच्याआधीच अटक करण्यात आली असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
Published on: Jun 28, 2023 11:44 AM