सचिन वाझे मुख्यमंत्र्यांना ‘गंडवत’ होता, मनसुखप्रकरणात खोटी माहिती दिली : NIA
सचिन वाझे अँटिलिया प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोटी माहिती देत होता. मनसुख हिरेनच्या हत्येनंतरही ती आत्महत्याच आहे असं वाझेने मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होतं, असं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) अँटिलिया प्रकरणात (Antilia bomb scare) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोटी माहिती देत होता. मनसुख हिरेनच्या हत्येनंतरही ती आत्महत्याच आहे असं वाझेने मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होतं, असं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. “मनसुखचा मृत्यू ही आत्महत्याच आहे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून काहीही विशेष बाहेर येणार नाही” असं वाझेने मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होतं, असा दावा एनआयएने केला आहे. शिवाय अँटिलिया स्फोटके प्रकरणात दहशतवादी अँगल नाही पण तपास फक्त मीच करावा अशी मुभा द्या असंही वाझेने मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं.