ठाकरे यांच्या अडचणीत वाढ? ‘मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची SIT चौकशी लावा’, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली मागणी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी शिवसेना-भाजप युतीचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेतील घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपच्यावतीने केला जात आहे. आता त्यातचं शिवसेनेच्याच नेत्याने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी शिवसेना-भाजप युतीचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेतील घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपच्यावतीने केला जात आहे.गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होतं. आता त्यातचं शिवसेनेच्याच नेत्याने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘गेली 25 वर्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात असं एक ही काम झालं नाही ज्यात भ्रष्टाचार झाला नाही. आम्ही वेळ येईल तेव्हा सगळ्यांना ते दाखवू. या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. गरज पडली तर एसआयटी चौकशी लावावी आणि गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.