सुनील शेट्टी म्हणतो, टोमॅटो खाणं कमी केलं; सदाभाऊ खोत भडकले अन् म्हणाले, “जागतिक भिकारी…”

| Updated on: Jul 14, 2023 | 3:06 PM

टॉमेटोचे दर तर दीडशेच्यावर गेल्याने ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. अभिनेता सुनिल शेट्टी यांने देखील "सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे," असं म्हटलं. त्याच्या या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. टॉमेटोचे दर तर दीडशेच्यावर गेल्याने ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. अभिनेता सुनिल शेट्टी यांने देखील “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही,” असं वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा आहे. तो जागतिक भिकारी आहे. शेतकऱ्याला कधीतरी चांगला दर मिळाला तर तुमच्या सारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं. सुनील शेट्टी तुम्ही बाजारू कलावंत आहात. सुनील शेट्टी भीक मागायला आला तर त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका,” असं सदाभाऊ खोत म्हणाले.

Published on: Jul 14, 2023 03:06 PM
मनसेचं ‘एकला चलो रे’, पाहा लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले राज ठाकरे…
खाते वाटपाचा तिढा सुटला, कुणाला कोणतं खातं मिळणार? पाहा संभाव्य यादी