“सैतान हा गावगाड्यातील शब्द, माझ्याकडून अनावधानाने…” शरद पवार यांच्यावरील टीकेवर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सैतान हा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टिका होऊ लागली आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सैतान हा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टिका होऊ लागली आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझ्याकडून अनावधानाने “सैतान” हा शब्द गेला आहे. गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली. मला सेनापती गावगाड्याकडे येत आहे त्याला रोखूया असं म्हणायचं होतं. सरदारांची जमवाजमव होता कामा नये, ही त्यामागची माझी भूमिका होती. शरद पवार यांनीदेखील समृद्धी महामार्गाच्या अपघात झाला त्यावेळेस काही लोक “देवेंद्रवासी” झाले असा शब्दप्रयोग केला होता. पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा, परंतु शरद पवार यांनी तो अनावधानाने केला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का? कारण गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये थोडाफोडी कोणी केली? याचा इतिहास तपासावा लागेल.”