रविकांत तुपकर यांच्या नाराजीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजू शेट्टी बदमाश माणूस…”
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पक्षात पुन्हा फूट पडणार असल्याची चर्चा आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्यावर नाराज असून बंड करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पक्षात पुन्हा फूट पडणार असल्याची चर्चा आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्यावर नाराज असून बंड करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “राजू शेट्टी यांनी संघटनेत काम करणाऱ्या लोकांचा घात केला आहे. राजू शेट्टी हा मांजरीची जात आहे. बोका कसा आपल्या पिल्लांना मारतो तसा हा बोका आपल्या पिल्लांना मारतो. रविकांत तुपकर हे विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम गेल्या वीस वर्षापासून करत आहेत. परंतु त्यांना काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या, त्या संदर्भात त्यांनी माझ्यासोबत सुद्धा चर्चा केली होती. हे सुद्धा या प्रकरणांमुळे अस्वस्थ होते आता ते बुलढाणा जिल्ह्यामधून खासदारकीची तयारी करत आहेत, परंतु माझ्यासोबत सुद्धा असाच प्रकार जो आहे तो राजू शेट्टी यांनी केलेला आणि बहुजन नेत्यांना संघटनेमध्ये दाबण्याचे काम राजू शेट्टींनी केलं आहे.”