“शरद पवार सैतान, या सैतानाला त्याचे पाप…”, सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

| Updated on: Jul 09, 2023 | 6:04 PM

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी शब्दांत टीका केली आहे.

मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की, “80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. राजकारणाचा इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ 50 वर्ष या राज्यामध्ये राहिला. पुण्यात ‘काका मला वाचवा’ ही हाक महाराष्ट्राला ऐकू आली होती. पण…” सदाभाऊ खोत पुढे काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 09, 2023 06:04 PM
“नितेश राणे सरड्यासारखे रंग बदलणारे लाचार”, ठाकरे गटाची टीका
तर राज्यात पुन्हा मोठा भूकंप, आता काँग्रेस नेत्याने वर्तविले भाकीत