“शरद पवार सेनापती, त्यांना आता पळताना आणि लपतानाही पहायला मिळालं, देवेंद्रजी अभिनंदन”
तर त्यांनी आपण जनतेला मानतो, याचा निकाल जनताच लावले असं म्हणत जनतेच्या दरबारात आपली बाजू मांडण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर त्यांनी आपण जनतेला मानतो, याचा निकाल जनताच लावले असं म्हणत जनतेच्या दरबारात आपली बाजू मांडण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी यावेळी, जे कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असे त्यांनी म्हणताना शरद पवार यांनी केलेल्या पापांचे हे प्रायश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी खोत यांनी, एखादा युद्ध हरल्यावर पळून जावावा आणि लपायची जागा शोधावा तसे सेनापती पवार हे मी पळून जाताना पाहिले. तर ते आता जनतेला सांगत आहेत की मला लपायला जागा द्या. तर आतापर्यंत सरदारांच्या जीवावर राज्य करणारे आता जनतेच्या दारात जात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.