“आम्ही भाजपबरोबर, मात्र भाजप आमच्यासोबत आहे का?”, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली नाराजी

| Updated on: Jun 21, 2023 | 10:57 AM

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत नेहमीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असतात. मात्र अलिकच्या काळात ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान सदाभाऊ खोत यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत भाजपवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

जालना : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत नेहमीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असतात. मात्र अलिकच्या काळात ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान सदाभाऊ खोत यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत भाजपवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. “राज्यात महायुतीचं सरकार आलं. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अजून घटकपक्षांची आठवण झालेली नाही. बैठक बोलवायची की अजून आमचा नंबर आलेला नाही हे मला समजलेलं नाही. आता आम्ही म्हणतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. पण ते काही म्हणाले नाहीत की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पण आम्ही म्हणतोय त्यांच्याबरोबर आहोत. पण प्रत्येकाची वेळ येते”, असं सदाभाऊ खोत म्हणाले. जालना येथे पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपदाच्या प्रश्नावर आपली भावना मोकळी केली.

Published on: Jun 21, 2023 10:57 AM
बळीराजासाठी आनंदाची बातमी! या धरणातून सोडणार 1500 क्युसेकने पाणी, 25 जुलैपर्यंत विसर्ग राहणार सुरू
राऊतांच्या मागावर वादग्रस्त वक्तव्य; आता ‘त्या’ वक्तव्यावरून विधान परिषदेतही तक्रार