पहाटे शपथ घेतली अन् आता सोबत न यायला काय झालं?; सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

| Updated on: Apr 17, 2023 | 11:13 AM

Sadabhau Khot on Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

पुणे : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे पहाटेचे शपथ घेऊन आले आहेत. मग पुन्हा सोबत न यायला काय झालं? राजकारणात कुणीही कुठेही जाऊ शकतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. राजकारण हा एक गोंधळ आहे. वातावरण तयार करण्यासाठी हे सगळे लोक गोंधळ घालत आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील असंच वातावरण तयार करतात. म्हणजे पुढे पक्षांतर करायचं असेल तर ते सोपं जातं. हे फक्त वातावरण तयार केलं जात आहे. महाराष्ट्राचं राजकारण हा पोरखेळ आणि चेष्टेचा विषय झाला आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं, असंही सदाभाऊ म्हणाले आहेत.

Published on: Apr 17, 2023 11:13 AM
श्रीभक्तांपेक्षा राजकीय नेत्यांची सोय पाहण्यात आल्यानं ही घटना घडली; राऊत यांची खरमरीत टीका
“मविआ सत्तेसाठी एकत्र, पण त्यांचे विचार एक नाहीत! त्यामुळे वज्रमूठ सभा यशस्वी होणार नाही”