पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे कायम केले – सदाभाऊ खोत

| Updated on: Mar 29, 2022 | 12:01 PM

शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले. त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी जहरी टीका रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते. सदाभाऊ म्हणाले की, शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे.

शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले. त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी जहरी टीका रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते. सदाभाऊ म्हणाले की, शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे. शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. सध्या सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते आज शेतकरी मेळाव्याला हजर राहणार आहेत. त्यापू्र्वीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आता याला राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) कोण प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

Published on: Mar 29, 2022 12:01 PM
जमिनीच्या वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला
Award :ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव