‘फडणवीस पहिलाच पट्ट्या, पवार यांची गुगली, बँट, स्टंपा आणि बोल ही घेतला’; शरद पवार यांच्यावर कोणाची टीका
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. फडणवीस आणि पवार यांच्यात सध्या गुगलीवार पहायला मिळत आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत फडणवीस यांचे कौतूक केलं आहे.
सोलापूर : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. फडणवीस आणि पवार यांच्यात सध्या गुगलीवार पहायला मिळत आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत फडणवीस यांचे कौतूक केलं आहे. यावेळी खोत यांनी, पवार यांच्यावर टीका करताना, पवार यांना फलंदाजी, गोलंदाजी करता येत नसतानाही ते क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहेत. पण त्यांना यातील काहीच येत नाही. तर ते कुस्ती संघटनेचेही अध्यक्ष होते. पण मी कधी त्यांनी, कुस्त्या गाजवल्याचं किंवा हिंदकेसरी पुरस्कार आणल्याचं ऐकलं नाही. पण जिथे पैसा आहे. तिथे पवार घराणं अशी टीका त्यांनी केली आहे. तर राज्यातील सहकार साखर कारखानदारी पवार यांनी मोडीत काढली. त्यांनी 50 कारखाने खाजगी करत आपल्या ताब्यात घेतल्याचा घणाघात केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती चोरांची टोळी असल्याचंही खोत यांनी म्हटलं आहे. तसेच ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पवार याचं नाव हे शकुनी मामा म्हणून नोंद होईल अशीही टीका खोत यांनी केली आहे.