‘त्यांच्यावर बोलणं म्हणजे शाप!’; सदाभाऊ खोत यांचा राऊत यांच्यावर घणाघात
तर राऊत याचं आपल्याला काय कळना. त्यो महाभारतातला संजय युद्धात काय खरं चाललंय हे धृतराष्ट्राला सांगायचा. मात्र हा उद्धवला एवढं खोटं सांगितलं की एका रात्रीत गडी निघून गेले.
सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापूरात काल जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाना साधत त्यांच्यावर टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती चोरांची टोळी असल्याचं खोत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या समृद्धी महामार्गावरील वक्तव्यावर विचारलं असता त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानावाने असणारा महामार्ग हा काही शापित असून शकतो का असा सवाल केला. तर राऊत यांच्यावर बोलणं म्हणजेच शाप असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. तर राऊत याचं आपल्याला काय कळना. त्यो महाभारतातला संजय युद्धात काय खरं चाललंय हे धृतराष्ट्राला सांगायचा. मात्र हा उद्धवला एवढं खोटं सांगितलं की एका रात्रीत गडी निघून गेले. तर गावागाड्यांमध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक घुबाड बघितलं की दिवसभर चिंतेत राहायचे की आज काय घडतय की? आज कोण जातंय की काय? जेवायची नाहीत. त्यामुळे आता राऊत यांच्यावर काय बोलायचं?