मग 40 वाडप्यांची गरज काय
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय का होत नाही यावर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया व्यक्त केली, ते म्हणाले जर दोघं वाडपी चांगले असतील तर 40 आमदार पाहिजे कशाला असा सवालही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर राज्यातील जनसामान्यांसाठी महत्वाचे आणि चांगले निर्णय घेतले असल्याचे गौरवद्गगार रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी काढले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर 2019 मध्ये ज्या पूरग्रस्तांचे प्रचंड नुकसान झाले होते, त्यांना आता अनुदानाच्या माध्यमातून फायदा मिळणार आहे. त्यामुळे आलेलं सरकार हे जनसामान्यांचा विचार करणारे सरकार असल्याची भावनाही त्यानी यावेळी व्यक्त केली आहे . एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच राज्यात सत्तापरिवत्न झाले असल्याचेही त्यांनी सांगितल. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय का होत नाही यावर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया व्यक्त केली, ते म्हणाले जर दोघं वाडपी चांगले असतील तर 40 आमदार पाहिजे कशाला असा सवालही त्यांनी केला.
Published on: Jul 16, 2022 07:05 PM