साई मंदिरातील वाद विकोपाला…
फुले, हार आणि प्रसाद विक्री करणाऱ्यांचा वाद आता विकोपाला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साई मंदिर व्यवस्थापनाने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे.
शिर्डीतील साई मंदिरातील फुले, हार आणि प्रसादाचा वाद आता विकोपाला गेल्याचे चित्र दिसून येत आहे. आजपासून शिर्डीमंदिरासमोर आंदोलनकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. साई मंदिरासमोर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये हजार शेतकरी, फुले आणि हार आणि प्रसाद विक्री करणारे अडीच व्यावसायिक आहेत तर ओवणी करणाऱ्या महिलांचाही यामध्ये समावेश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तीन ते चार हजार मजूुरांच्या रोजगारावर पाणी सोडण्याच काम केले जात असल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे फुले, हार आणि प्रसाद विक्री करणाऱ्यांचा वाद आता विकोपाला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साई मंदिर व्यवस्थापनाने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे.
Published on: Aug 27, 2022 11:34 AM