ईडीच्या कारवाईचा ससेमिरा; अनिल परब यांची उच्च न्यायालयात धाव

| Updated on: Mar 14, 2023 | 8:30 AM

माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाली आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. परब यांनी त्यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेला ईसीआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. तर या प्रकरणात माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक झाली. त्यानंतर परब यांच्या बाबतीत ईडी कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तासंघर्षावर आज पडणार पडदा? सुनावणीकडे राज्याचे लक्ष
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे पण…; ठाकरेगटाच्या नेत्याची मागणी