“आम्ही आमदार, खासदार नाही, पण युद्धाच्या काळात आम्ही शरद पवार यांच्यासोबत”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Jul 05, 2023 | 1:54 PM

आज शरद पवार यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटर बाहेर जमले होते.यावेळी कार्यकर्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर या देखील उपस्थित होत्या.दरम्यान सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : आज शरद पवार यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटर बाहेर जमले होते.यावेळी कार्यकर्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर या देखील उपस्थित होत्या.दरम्यान सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. “ओरिजन पार्टी ही शरद पवार यांची आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे सगळे सत्तेसाठी शरद पवारांना सोडून गेलेले आहेत. अशा परिस्थितीतही आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमच्याकडं ना कुठली आमदारकी आहे. ना ही कुठली खासदारकी, कुठल्याही पदासाठी आम्ही इथं आलेलो नाही. तर पवारसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. तसंच अमोल मिटकरी यांना स्वतःची ग्रामपंचायत राखता आली नाही.अमोल मिटकरी बाजारू विचारवंत आहेत त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही त्याच्यासारखी आयती आमदारकी लाटली नाही,” असं सलक्षणा सरगर म्हणाल्या.

 

Published on: Jul 05, 2023 01:54 PM
“तेव्हा अजितदादा एकनाथ शिंदे यांना ज्युनिअर म्हणायचे आणि आता…”, संजय राऊत यांचा टोला
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं अजित पवार यांना आव्हान; म्हणाले, “…तर 40 आमदारांचा फोटो दाखवा”